|
१.तालुक्याचे नाव- मोहोळ
२.नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्याचे नाव-श्री.अ.अ.शेख
श्री.द.तू.घोळवे
३.शाळचे नाव-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
बनाचा ओढा, पेनूर
४.उपक्रमाचे शीर्षक- बचत बँक
५.उपक्रमाची उद्दिष्टे – १.बचतीचे महत्व
पटवणे.
२.जमा खर्चाचा अनुभव प्रत्यक्ष देणे.
३.बचतीचे फायदे जाणणे.
६.उपक्रम कोणासाठी राबविण्यात आला-विद्यार्थी
ई.१ली ते ५वी /८वी
७.उपक्रमाची कार्यवाही –दररोज निर्धारित
वेळेमध्ये सचिव व सहसचिव पैसे जमा करतील;अध्यक्षांच्या मदतीने ज्या सदस्यांनी
पैसे जमा केले असतील त्यांच्या नावासमोर नोंदवतील .
नोंदवहीत जमा व खर्च असे दोन रकाने
करणे.एखाद्या विद्यार्थ्याची (सदस्याची)अडचण आल्यास सचिव अध्यक्षाच्या परवानगीने
आवश्यक तेवढी रक्कम त्याच्या जमा रकमेतून देतील.ही बचत बँक जून ते एप्रिल या
कालावधी पर्यंत असेल.एप्रिल अखेर जमा रक्कम त्या त्या सदस्याला परत करावी.बँकेची
वेळ –सोम ते शनिवार मधली सुट्टी.
८. फलनिष्पती -१.बचतीचे महत्व समजते.
२.थोडीशी का होईना बँकेच्या व्यवहाराची कल्पना येते.
३.बँक खातेवरपेसे जमा असतील तर
शैक्षणिक सहलीत सहभागी होता येते .
४.आवश्यक असलेले साहित्य विकत घेता
येते.उदा.पेन्सील,पट्टी,पेन,वही,कंपास
५.जमा रकमेतून आवश्यक त्या वेळी पैसे काढता
येतात.
|
Thursday, March 3, 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment